Saturday, January 8, 2022

सुखी आयुष्यासाठी ९०-१० चे सुत्र


 

सुखी आयुष्यासाठी ९०-१० चे सूत्र 

मित्रांनोजगप्रसिद्ध तत्वज्ञ स्टिफन कोव्हे  यांच्या म्हणण्यानुसार आपल्या आयुष्यात९०-१० चे सूत्र महत्त्वाचे आहे.

काय आहे हे सूत्र ?

स्टिफन कोव्हे सांगतात, ‘आपल्या आयुष्यातील फक्त १०% आयुष्य हे आपल्याबद्दल काय घडते’ याने बनलेले असतेआणि आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो’ यावर उरलेले ९०% आयुष्य अवलंबून असते. हे खरं वाटत नाहीचला जरा समजावून घेऊ.

खरोखरच ज्या आपल्यावर परिणाम करतातत्या १०% गोष्टी आणि घटनांवर आपले काहीच नियंत्रण नसते. पण उरलेलेथोडेसे विचित्र वाटेलपण आपण ते ओढवून घेतो. कसे?

पहिल्या १०% ला जी आपली प्रतिक्रिया असतेत्यावरून आपणच ते उरलेले ९०% ठरवतो.

आपण सिग्नलचा लाल दिवा कंट्रोल करू शकत नाहीपण आपली त्यावरची प्रतिक्रिया निश्चितच कंट्रोल करू शकतो. एक उदाहरण घेऊ...

समजा, सकाळची ऑफिसला निघण्याची तुमची वेळ आहे. कपडे करून ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही तयार होऊन नाश्ता घेताहात. तेवढ्याततुमची मुलगी येते आणि तुमच्या चहाच्या कपाला तिचा धक्का लागतो. सगळा कप तुमच्या छान कपड्यांवर सांडतो.

आता मला सांगाहे जे काही घडलं त्यावर तुमचा काही कंट्रोल होता? नाही ना ? मग....

तुम्ही चिडता. कदाचित रागाने तिला एक धपाटा घालता. ती रडू लागते.

आता तुम्ही पत्नीकडे वळता. चहाचा कप टेबलवर इतक्या कडेला ठेवल्याबद्दल तिच्यावर चिडता. एक छोटेसे भांडण होते. मुलगी येऊन धडकणार हे तिला तरी कुठे माहीत होतेती समर्थन करू पाहाते. तुम्ही अजूनच भडकता. रागारागाने तुम्ही आतल्या खोलीत जाता. शर्टपॅन्ट बदलता.

दरम्यान तुमची मुलगी रडतच नाश्ता करत असते. तिच्या शाळेची बस / रिक्षा निघून गेलेली असते. तुमच्या पत्नीचे बरेच अजून आवरून व्हायचे आहे. शेवटी तुम्हालाच तिला शाळेत सोडायला निघावे लागते. तुम्ही रागाने धुमसतच आपल्या वाहनावरून तिला सोडायला जाता. आता तुम्हाला चांगलाच उशीर झाला आहे. त्यामुळे तुम्ही रॉन्ग साईडने किंवा नो एंट्रीत वेगाने गाडी चालवत जाता. पोलीस’ तुम्हाला हेरून थांबवतो. शेवटी दंड/तडजोड करून तुम्ही १५ मिनीटे उशिराने शाळेजवळ पोहोचता. तुमची मुलगी अजूनही घुश्श्यातच आहे. ती तुम्हाला टाटा न करताच शाळेत धावते. अशा मनस्थितीत तुम्ही ऑफिसला पोहोचता. तुम्हाला चक्क २० मिनिटे उशीर झालेला असतोआणि पोहोचल्यावर लक्षात येते की तुमचे पंचिंग कार्ड घरीच आधीच्या शर्टामध्ये विसरले. तुमचा दिवसच वाईट सुरू झाला. आणि आता तो अजूनच खराब जाणार याची चिन्हे दिसू लागतात. केव्हा एकदा ऑफिस सुटते आणि केहा एकदा आपण घरी पोहोचतोयाची तुम्ही मनातल्या मनात चरफडत वाट पाहाता. तुम्ही घरी परत येता तेव्हा आपल्यात आणि पत्नीतसकाळच्या भांडणामुळे किंचितसा दुरावा निर्मान झाल्याचे तुम्हाला जाणवते.

हे सगळं कशामुळे?

१: चहाच्या कपामुळे?

२: तुमच्या मुलीमुळे?

३: पत्नीमुळे?

४: पोलिसामुळे?

५: की तुमच्या स्वतःमुळे?

उत्तर आहे: तुमच्या स्वतः मुळे!!

चहाचा कप सांडण्यावर तुमचा कंट्रोल नव्हता. पण त्यानंतरच्या 5 सेकंदात तुम्ही ज्या रीतीने प्रतिक्रिया दिलीत, (स्वतःच्या मनाशीइतरांशी) त्यामुळे तुमचा दिवस वाईट गेला.

पटतंयजरा विचार करा. तुम्ही असे करू शकला असतात तर..?

चहाच्या कपाला मुलगी धडकली... चहा कपड्यांवर सांडला....तुमच्या मुलीला अर्थातच अपराध्यासारखं वाटलं. ती रडणारच होतीपण तुम्ही शांतपणे समजावलं, “असू दे बेटाजरा काळजी घेत जाजरा लक्ष देऊन वावरत जा.” तुम्ही एक टॉवेल घेऊन आतल्या खोलीत गेलातकपडे बदललेत आणि हॉल मध्ये आलात. तुमच्या मुलीची बस / रिक्षा नुकतीच आलेली पाहिलीत. तुम्ही तिला खिडकीतून टाटा केलंत. तुम्ही नेहमीच्या वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचलातआणि प्रसन्न मनाने सहकार्‍यांना हायहॅलो केलंत.  

फरक जाणवलादोन विरोधी दृष्यं. दोन्हींची सुरुवात सारखीच झाली. पण शेवट मात्र किती वेगळाअगदी विरुद्धच!  

काकारण तुम्ही दिलेली प्रतिक्रिया!

खरोखरीचपहिल्या १०% वर तुमचा कंट्रोल नाही. पण उरलेले ९०% तुमच्या प्रतिक्रियेवर / प्रतिसादावर अवलंबून आहे.

हे ९०-१० सूत्र वापरून तर पाहा.... त्यामुळे मिळणारा फायदा पाहून तुम्ही थक्क व्हाल. आणि हे करून पाहण्यात जाणार काय आहेकाहीही नाही.वापरून तर पाहा!

- श्री. शिरीष कुलकर्णी , SWS  टीम  


1 comment:

  1. खूप छान आणि विचारप्रवर्तक.

    ReplyDelete