Saturday, January 1, 2022

धन संचय / गुंतवणूक : पुस्तक परिचय

 



★★ द इंटेलिजंट इन्व्हेस्टर ★★

। बेंजामिन ग्रॅहॅम । अनुवाद : अतुल कहाते
विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारामधल्या गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणार्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं. तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.


 

★★ फ्लर्टिंग विथ स्टॉक्स★★
शेअर बाजार समजून घेताना
डॉ. अनिल लांबा अनुवाद: वीरेंद्र ताटके
चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…
१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?
२. रेशो अॅनालिसिस म्हणजे काय?
३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?
४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?
५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?
६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?
याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही… शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!

 

★★माझं कुटुंब, माझी गुंतवणूक★★
स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन
वीरेंद्र ताटके
आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन! गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे… एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च
अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात. बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात. मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !
★★★★★★★★★★

अधिक माहिती

No comments:

Post a Comment