Saturday, November 27, 2021

सकारात्मक भाषा

एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं.

 पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील". तर दुस-या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव" !

खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरेन घसरून खाली पडला.मात्र दुस-या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला.

काय बरं असेल यामागचं कारण ? 

पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.  या उलट दुस-या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला.

आपण नेहमी सकारात्मक भाषा वापरली पाहिजे, सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा,मग कोणतीही परिस्थिती तुम्हाला सकारात्मक बदल देईल ;म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा !!

🌹Think Positive, Be Positive.🌹

(स्रोत : कायप्पा )

No comments:

Post a Comment