Saturday, November 13, 2021

चांगल्या विचारांचा दिवा.... 🙏🏻🙂

चांगल्या विचारांचा दिवा.... 🙏🏻🙂

दीपोत्सवाच्या  निमित्याने "चांगले विचार "रुजवायचा छंद लावण्याचा एक दिवा नक्की लावा 👍👍👍

माझ्या सर्व छंदांमध्ये हा छंद माझ्या सर्व अडचणीनं मधे खूप कामाला आला ...येत आहे.

जीवनात यशस्वी व्हायचंय कीं स्थिरता हवी!!... ह्यावर विचार केला... चांगल्या विचारांनी स्थिरता तर येतेच पणं तब्बेतही सुदृढ  रहाते,हें लक्षात आलं आणि स्थिरता महत्वाची वाटली आणि तेव्हापासून जास्त प्रगती झाली.. होतं आहे 😊कारण निरीक्षण केल्यावर लक्षात आलं कीं....सौंदर्य, आपले स्किल,आर्ट, प्रसिद्धी, पैसा अर्थात सर्व बाह्यगोष्टींसाठी यश मिळावं म्हणून त्यांच्या मागे धावत रहातो आणि हें सर्व काही काळापुरताच टिकणारं आहे ( वय  झालं कीं सौंदर्य कमी होतं, स्किल जमेनासे होतात, प्रसिद्धी कायम कधीच नसते, पैसा सर्वकाही नसतोच!! )मात्र आपले चांगले विचार अर्थात माझा हा छंद , ह्या जन्मी शेवटपर्यंत साथ तर देणारच आहें पणं पुढल्या जन्मी देखील कामाला येणार आहे.कारण सोबत चांगले संस्कारच घेऊन जाता येतात 🤩

लोंग आईना भी नहीं देखते, अगर आईने में चित्र की जगहं चरित्र दिखता!!!

खरंय नाही!! "उत्तम विचार - उत्तम संस्कार - उत्तम चरित्र "...चांगले विचार म्हणजेच Right thiking, करायची सवय लावून घ्यावी लागते.... खूप चांगल ऐकलं, खूप वाचन केल्याने बदल घडत नाहीत तर त्याप्रमाणे चिंतन करून,ठरवून वागलं तर बदल घडतात....

 Attention goes... Energy flows... Things grows. किती बरोबर आहे नाही !!✔️✔️✔️

जसं पाणी सतत वाहत राहायला हवं, रक्त सतत फ्लो होतं राहिलं पाहिजे तसेच विचारही बदलले पाहिजे!!... पाणी साचले कीं किडे पडतात वास येतो.... रक्त फ्लो व्हायचं थांबलं कीं गाठी तयार होऊन रोग निर्माण होतात,अगदी त्याप्रमाणेचं तेच तेच चुकीचे विचार डोक्यात ठेऊन आपण रोग निर्माण करत असतो.

मी बघत असते लोकं किती छोट्या छोट्या गोष्टींचा राग डोक्यात ठेऊन जगत असतात 😔 असंही म्हणतात,आजकाल विसरायला फार होतं मात्र  जुना राग असेल तर , तो मात्र विसरत नाही 🤩मज्जा आहे नाही !! Let go करून मोकळं व्हायचं नं!! नाही ते डोक्यात ठेऊन अख्ख आयुष्य घालवतात 😂

स्वास्थ म्हणजे काय?? तर स्व मधे स्थित रहाणे....जितके रिलॅक्स राहू तेव्हडे निरोगी राहू... अगदी साधं सुधं गणित आपणच अवघड करून ठेवलंय.... मग हें सोडवणं चांगल्या विचारांच्या छंदानं मुळे नक्कीच शक्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा छंद जोपासायला सुरवात केलीये  results मिळतांना बघून शेअर करावेसे वाटले 😍.... ह्या छंदामुळे आपण काहीही कारण नसतांनाही आनंदी रहातो🤗 शेवटी आयुष्यात आनंदच हवा असतो ना!! आनंदासाठी  किती खटाटोप चालू असतो सर्वांचा... गाडी हवी, बंगला हवा, सोनं.. चांदी, यश (हल्ली तर ड्रग्स पणं घ्यायला लागलेत 😔) वगैरे वगैरे आणि हा आनंद थोड्याच काळापुरता असतो बरं!!😔 मग माझा हा छंद नक्कीच मस्त नाही का??free of cost 😂चांगल्या विचारांवर आनंद आणि सुदृढ तब्येत फ्री 👏

चांगले विचार करा आनंद मिळवा 💃💃💃

आनंदी रहाण्यासाठी दुसरी साधीसोपी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे नाहीये तेच आपल्याला हवं असतं जे दिलंय त्याची कदरच नसते😔... मी ठरवून टाकलंय, परमात्म्याने जे दिलंय त्याचे धन्यवाद मानतं रहायचे 🙏🙏🙏करून बघा... खूष रहाल 😍

टेन्शन येतय... आजारी पडताय.... डिप्रेशन येतय... चेहरा काळवंडलाय... एकटेपणा वाटतोय... वजन वाढतंय...झोप येत नाहीये... चिडचिड होतेय... मित्र मैत्रिणी नाहीत... स्वतःला ग्रेट समजत आहात कीं स्वताहात कमी पणा वाटतोय..... ह्या सर्वांना एकचं सोल्युशन.... चांगलें विचार करायचा छंद लावा आणि सकारात्मक लोकांमध्ये राहून आरोग्य संपूर्ण आयुष्य जगून  रोज दीपोत्सव साजरा करा 😍


- प्रतिभा चौधरी ( Source : Social Media)

No comments:

Post a Comment