Saturday, January 23, 2021

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १४: डॉ. सी. आर. कर्णिक आणि लेखांक १५: श्री.उदय शंकर अवस्थी -- श्री. बलबीर अधिकारी

 


लेखांक १४: डॉ. सी. आर. कर्णिक

   मी नुकताच एफ.वाय.बी.एस्सी. कसा बसा सुटला होतो. एस.एस.सी. पर्यत हॉल ऑफ फेम मध्ये मोडणारा परंतु पुणे विद्यापीठाने नुकत्याच लागू केलेल्या तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत सापडून केवळ 17 टक्के निकाल असलेल्या वर्षी प्री डिग्री सुटलेला ज्यावर्षी भविष्याची दिशा ठरते  त्या एफ.वाय. च्या वेळी सायकल अपघातात सापडून डॉक्टर होण्याऐवजी सैरभैर होऊन बी.एस्सी. स्वीकारलेला मी त्यावेळी जळगावात होतो. भावाला नुकतीच नोकरी लागली  होती. ती जळगावातच. त्याच्या आधाराने पदवीतरी मिळवावी म्हणून तेथील मुळजी जेठा कॉलेजात मी प्रवेश घेतला होता. त्यावेळी रसायन हा प्रमुख विषय, वनस्पती प्राणीशास्त्र आवश्यक असा विनापुस्तक इंग्रजी विषय असा गट होता. गाव कॉलेज नवीन होते. लेक्चर्सला दांडी मारण्याची सवय नसूनही सारे बिनघडीचे असल्यामुळे मन लागत नव्हते. पण गाडी रेटण्यासाठी प्रयत्न चालूच होता.

   एके दिवशी आम्ही दोनचार वर्गमित्र कॉलेजच्या मैदानावर उभे होतो. त्यावेळी खाकी कपडे, हातात छत्री, गोरापान वर्ण, भव्य कपाळ चकचकीत चेहरा असलेली एक व्यक्ती आमच्याकडे चालत आली. त्यांनी आम्हाला दमात घेतले.

काय करताय? लेक्चर नाही ?

आहे ! दबलेल्या आवाजात आमचा कोरस.

मग ? माकडछाप इथे काय करताय?

अजून सर आले नाहीत आम्ही.

स्वागताला हार आणलाय?

नाही ! आमचा गोंधळ.

कोणाचे लेक्चर आहे ?

कर्णिक सरांचे आम्ही

कोण कर्णिक? डॉ. कर्णिक ? अरे माकडांनो, मीच तो थोर माणूस आहे. चला.

   हातातील छत्री फिरवत आमच्याशी ओळखीचे-सलगीचे बोलत कर्णिक सरांनी आमच्यासह वर्गात प्रवेश केला. ते एन.सी.सी. चे कमांडर होते. त्या दिवशी परेड होती म्हणून ते अशा वेषात होते. हे उलगडायला आम्ही थोडा वेळ घेतला. पण त्यांच्या मोकळेपणामुळे आम्ही थोडे स्वस्थ झालो आणि लेक्चर सुरू झाले.

   डॉ. कर्णिक नेहमी उत्साही वाटत. जळगावात ते एकटेच राहत. सुटीत मुंबईला कुटुंबाकडे जात. विद्याथ्यार्र्ंना माकडछाप म्हणण्याची त्यांना सवय होती पण त्यात तुच्छता नव्हती. आपलेपणा होता. जवळीक साधण्याचा बरोबरीने वागवण्याचा प्रांजळपणा होता. वनस्पतीशास्त्र शिकवताना ते तल्लीन होत.  भटकण्याचे ते षौकीन होते. पी.एच्डी. करताना वनस्पतींचे विविध नमुने मिळवण्यासाठी त्यांनी विंध्य सातपुडा पर्वत पायी फिरले होते. साधी कामे स्वत: करण्याचे कौशल्य सवय असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास जाणवे. वनस्पती शास्त्र विभागाचे ते प्रमुख असले तरी ते आम्हाला केवळ बाह्यरचना वंशगुणवर्धन (Physiology & Genetics) शिकवत. अंतर्रचना (Anotomy) शिकवणार्या दुसर्या प्रोफेसर बाई होत्या.

   वनस्पतीशास्त्र घेऊन बी.एस्सी. करणारे त्या काळी थोडे असत. त्यामुळे प्राध्यापकांशी सहकार्यांशी अधिक परिचय मैत्री होणे सहज क्रिया असे. कर्णिक सर मोकळे असल्याने आम्ही त्यांच्याकडे ओढले जात असू. त्यांचा, प्रोफेसर बाईंना कधी कधी गुस्सा येत असे. असेच एकदा निरीक्षण फेरीसाठी आम्ही सरांबरोबर गेल्यामुळे बाई रागावल्या होत्या. त्यांची लेक्चर्स शिकवणे थांबले होते. त्यातच सहामाही परीक्षा झाली बाईंनी त्यांच्या पेपरात आम्हा सार्यांना नापास केले. ह्या फटक्याने आम्ही हादरलो सरांना या शिक्षेची माहिती दिली. त्यांचा पेपर यायचा होता. दोन्ही पेपर्सची उत्तीर्णता समाईक होती. दोनशे पैकी सत्तर गुण असणे आवश्यक होते सरांचा पेपर हाती आला त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या पेपरात 70 पेक्षा अधिक गुण घेतलेले दिसत होते. आम्ही सारेच पास झालो होतो. बाईंच्या रागाला असे उत्तर देऊन आमची सुटका केली होती. नंतर गप्पा मारताना त्याची कारणमीमांसा करताना आमचा प्रामाणिकपणा बाईंचा आकस यात प्रामाणिकपणाचे तागडे अधिक मोलाचे ठरवले होते.

   एन.सी.सी. कँप परेड यांच्यावेळी कर्णिक सर वेगळेच दिसत. वेगळे वागत - शिस्तप्रिय असल्यामुळे कामचुकार विद्यार्थ्यांना ते शिक्षा देत. शहराच्या विविध गटामध्ये त्यांची चमकदार .सी.सी. कमांडर म्हणून ख्याती होती. अनेक प्रसंगी त्यांनी आपली योग्यता सिद्धही केली होती. ते आमचे सर आहेत याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटे.

   कर्णिक सर अत्यंत महत्त्वाकांक्षी होते. ते ज्या जागेवर काम करीत ती मानाची असली तरी ते अधिक मोठे होऊ इच्छित होते. आमच्याशी बोलतानाही ते कधी त्याचा उच्चार करीत. त्यांचे त्या दृष्टीने प्रयत्न चालूच होते. वर्षाअखेरीस सागर विश्वविद्यालयात त्यांना प्रोफेसर म्हणून बोलवणे आले त्यांनी जळगाव सोडले.

   रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपल्या वळणदार अक्षरांत माझ्या डायरीत लिहिले.

        'Rise high my son, be my blessings help you to achieve the goal.' 

   ती डायरी आजही माझ्या संग्रही आहे. तथापि त्यांचे Rise high म्हणजे नक्की काय याचा मला अजूनही पत्ता लागलेला नाही. काय मिळवले म्हणजे माणूस मोठा होत असेल ? मूल्यांनी, सत्तेने की संपत्तीने ?

 


लेखांक १५: श्री.उदय शंकर अवस्थी


   आमच्या राष्ट्रीय केमिकल्स अँडअँडफर्टिलायझर्स कंपनीची एक सार्वजनिक खत रसायन उद्योग म्हणून नेहमीच चांगली कामगिरी झालेली आहे. 1978 साली स्थापन झालेल्या या कंपनीला सुरूवातीस दिलीपसिंह सारखा कर्तबगार अध्यक्ष लाभला होता. त्यामुळे सर्वच क्षेत्रात कंपनीच्या प्रगतीचा आलेख उंचावत होता. कामगार कल्याण, विक्री, पर्यावरण संतुलन, उत्पादन, संशोधन आणि विकास, टप्या-टप्प्यांनी विस्तार, मनुष्यबळाचा  वापर व्हावा म्हणून वेगवेगळे प्रकल्प, सामाजिक बांधिलकी, कृषि विकास . अनेक गोष्टी ते स्वत: पाहत. ते निवृत्त झाल्यावर आलेले अध्यक्ष 1990 साली निलंबित झाले. त्यानंतर काही काळाने उदय शंकर अवस्थी यांना पायराइटस्, फॉस्फेटस् ॅण्ड केमिकल्स लि. च्या जोडीने आर.सी.एफ. चा कारभार सोपविण्यात आला. तेही केवळ 11 महिनेच  या पदावर राहून पुढे इफको कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले. त्यांच्या आमच्या कंपनीतील वास्तव्यात ठळकपणे काही बाबी लक्षात आल्या.

   अवस्थी दिसण्यात साधारण परंतु संस्कृतीसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. भेटण्यास येणार्या प्रत्येक व्यक्तिविषयी अगत्य, बोलण्यातले लाघव, निर्णय घेण्याची क्षमता, शालीनता, वक्तशीरपणा, एवंगुण वैशिष्ठ्यांमुळे त्यांची कृति उपस्थिती उठून दिसे. स्वभावात ठामपणाही भरपूर. त्यामुळे चलबिचल, अस्थिर निवेदन, बदलणारे निर्णय संभाव्य परिणाम . चा प्रश् कधी येत नसे. भेटण्यास त्यांची ना नसे पण पूर्वसंमती आवश्यक मानली जाई. कार्यालयातही आमचे एक उपमहाव्यवस्थापक त्यांनी खास मदतनीस म्हणून घेतले होते. त्यांचे समाधान झाल्यास ते प्रस्ताव वा व्यक्ति पुढे जाऊ देत नसत. महिन्याचे वेळापत्रक ते आधीच प्रसिद्ध करीत. त्यानुसार चालत. त्यामुळे कुठल्या दिवशी ते कुठे असतील याची चिन्ता नसे. सारे आखलेले असे. ते त्या वेळापत्रकाला स्वत: सांभाळत. त्यामुळे इतरांचा गोंधळ होण्याची शक्यता कमी असे. या सार्या ठामपणाचा फायदा इतरांप्रमाणे आम्हालाही होई. चंचलता, अस्थिरता आणि अनिश्चितता  यांचा प्रभाव त्या काळात जाणवत नसे. राज्य असे ते दबदब्याचे, दिलखुलास बोलण्याचे त्यांच्या वागण्यात बोलण्यात पदोपदी खानदानीपणाचे प्रदर्शन झालेले दिसे.

   येणारांची संपर्कात असणार्या छोट्यामोठ्या व्यक्तींची खातीरदारी करण्यात त्यांना आनंद वाटे. ते करताना देखिल ते फार निवड करीत. कधी ते स्तोम वाटे पण आग्रह आणि सत्ता यामुळे कधी कधी नाईलाजाने का होईना पण व्यवस्था करावी लागे. साधा चहा द्यायचा असला तरी ते, त्यातील कापड, किटली, टी कोझी, कपबशा, वेटरचे कपडे, चेहर्यावरची आदब, चहाची प्रत, सादर करण्याची रीत, थोडक्यात पद्धत प्रत (दर्जा) यांचे ते काळजीपूर्वक निरीक्षण करीत. सूचना करीत. करवून घेत. काटकसरीपेक्षा खर्चिकपणा त्यांना प्रिय असे. येणारा माणूस हे सारे पाहून त्यांच्या मार्दवामुळे विरघळून जात असे.

   ते वापरत असलेल्या गाडीचेही असेच असे. ती वातानुकुलीत, आवाज येणारी, चालक गणवेशात, आदब असलेला कुशल तसेच माहितगार हवा असे. संचालक मंडळाच्या सदस्यांना वा महत्त्वाच्या व्यक्तिंनाही अशीच सेवा देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी रहावयाची खोली आधी तपासलेली असे. भोजनासाठी येणारा पदार्थ उत्कृष्ट हवा असे. किती खाल्ले यापेक्षा कसे खाल्ले किती प्रकारे सेवा प्रदान केली या पेक्षा त्या सेवेची प्रत कशी होती याचाच विचार अधिक होत असे.

   चाळीस टक्क्यावर दारिद्र्यरेषा असणार्या आपल्या देशात सार्वजनिक उद्योग म्हणून मिरवणार्या आमच्या कारखान्यात या अगोदर अशा रीतीभातींना प्राधान्य नव्हते. सारे ठीक असे. परंतु त्याला एवढे महत्त्व पूर्वी नव्हते. कामाशी काम असा रोखठोक मामला होता. शिष्टाचार, आदब, वैयक्तिक आवडीनिवडी त्याही सार्याच बाबतीत पाहण्याची सवय नव्हती. सारे जण सरकार वा कंपनीचे नोकर अशी भावना होती. पूर्वी महनीय व्यक्तीही असे आग्रह कधी धरत नसत. मग उदयशंकरजी असे का वागत असतील ?

   येणार्या व्यक्तिस तो रेल्वेस्टेशन वा हवाई अड्डा यातून बाहेर आल्यावर तो प्रवास करणार असणारी गाडी, त्याची उतरायची जागा संपर्कात येणारी पहिली काही माणसे यांच्या वागण्यावरून तो कंपनी विषयी मत बनवतो त्याचे पडसाद होऊ घातलेल्या चर्चेवर निर्णयावर पडतात या अनुभवाचा अधार घेतला तर आदरातिथ्य सोय यांचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. आज काळ बदलला आहे सेवा सोय यांचे महत्त्व माणसाच्या मुख्य कामाशी निगडित आहे असे समजण्याची मनाला तयारी करावी लागत आहे. वर्हाडातल्या मानकर्यांनाही तुम्ही जपणार नाही एवढे येणार्या कार्यालयीन पाहुण्यांना जपण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पूर्वी माझे मत फार बाळबोध होते मला वाटे, मी जसा नोकर तसा तोही. मी माझे काम करतो आहे तसे त्यानेही करावे. देश, सरकार, सहिष्णुता. काम - सार्यांचेच आहे. मग मी त्या व्यक्तिसाठी एवढे वाकायची गरज काय? पण हे एवढे सरळ नसते हे मला मान्य करावे लागते आहे. चालत्या गाडीला खीळ बसावी त्याच बरोबर आपले न्यूनत्व (असले तर) झाकले जावे. सहानुभूतीचा वर्षाव नाही तरी भुरभुर आपल्याला अनुभवायला मिळावी म्हणून ही खातीरदारी. असे हे समीकरण मी माझ्या पुरते मांडले आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने ज्याच्या कलमात ताशेरे ओढायची शक्ती तो माणूस जपायला हवा. ज्याच्या सही-संमतीने आपले आहे तसे तरी चालेल किंवा कंपनीला काही लाभ होईल असे धोरण प्रबळ मानल्यास हे सारे सयुक्तिकच म्हणायला हवे. अवस्थी या सार्या प्रकाराचे महत्त्व चांगलेच ओळखून असत. त्यामुळे प्रत्येक विशेष व्यक्तीची काही गैरसोय होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील राहत.

   आमच्या निलंबित अध्यक्षांना पुन: कामावर रुजू  होण्याचे आदेश आल्यावर अवस्थींनी त्यांना आमच्या परिसराबाहेरच सूत्रे सोपविली. त्यामुळे त्यांना निरोप देता आला नाही हा सल कायम राहिला. एवढ्या शालीन माणसाशी आपण योग्य प्रकारे  वागलो नाही याची खंत वाटत राहीली पण इलाज नाही. ईश्वरेच्छा बलिर्यसि !

No comments:

Post a Comment