Saturday, January 2, 2021

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ९: पुरूषोत्तम मांडे आणि १०: डॉ. ग. ह. टिळक : श्री. बलबीर अधिकारी

 


पुरूषोत्तम मांडे

   ““महाराष्ट्रात आजवर केवळ तीन पुरूषोत्तम जन्माला आले आहेत.”“ कोण ! म्हणून भोळसटपणे विचारता, पुरूषोत्तम भास्कर भावे, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ...... पुरूषोत्तम रामदास मांडे असे स्फोटक विधान गंमतीने करणारा पु. लं. च्या विनोदाला सर्वांगाने दाद देणारा. पु. भा. च्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा मस्तीत जगण्याची मनापासून कदर करणारा अन् इंग्रजी, मराठी हिंदी पुस्तके अधाशासारखे वाचत राहून आपले विश् समृद्ध करणारा पुरूषोत्तम मांडे आमच्या दृष्टीने केवळ एक सहकारी नव्हता. सेवेत कार्यरत सैनिकांसारखेच औद्योगिक कामगारांचेही असते. तीन पाळ्यांमध्ये काम करणारी मंडळी निकट सहवासामुळे औद्योगिक धोक्यांचा एकत्र सामना करण्याच्या गरजेमुळे एकमेकांसाठी बरेच काही करू शकतात, करीतही असतात. या नियमानुसार पुरूषोत्तम मांडे सारखे इतर अनेक जण वेगवेगळ्या वर्तुळात होते. कुणाच्या नाट्य कोणाच्या युवा तर काही जणांच्या संगीत संस्था होत्या. पण बहुदा फार काळ मिळाल्यामुळे हा पुरूषोत्तम इथल्या कोणत्याही वर्तुळात नसला तरी स्वत: भोवती वर्तुळ तयार करणची त्याची क्षमता होती. त्या क्षमतेमुळेच तो आज ज्या कारखान्यात नोकरी करतो जिथे राहतो तिथे अनेक व्यक्ति संस्था यांच्याशी त्यांचा चांगला संबंध आहे.  

   माझ्यासाठी तो पुरूषोत्तम ह्या लिखापढीच्या नावावरून अरूण झाला तो विशिष्ट परिस्थितीमुळे. अरूण ज्या गावाहून मुंबईला आला होता ते नंदुरबार माझ्या दृष्टीनेही महत्त्वाचे होते. माझ्या पत्नीची मावशी तिथे रहात असे. त्यामुळे माझे तिथे जाणे येणे होतेच. त्या गावाविषयी मला गूढ आकर्षण आहे. मावशीचे नंदुरबार, देशभक्त हुतात्मा शिरीष कुमारचे नंदुरबार, व्याघ्रेश्वरी देवीचे नंदुरबार, अतिशय चवदार तूरडाळ पुरवणारे नंदुरबार आणि आता अरूणचेही नंदुरबार असा हा मेळ होता. अरूणच्या घरीही मी सपत्नीक जात असे. त्याच्या आई-वडिलांचा मलाही लळा लागला होता. अरूण त्यांचा एकच मुलगा. कदाचित माझ्यात ते दुसरा मुलगा शोधत असावेत इतके अगत्य त्यांच्या वागण्यात जाणवे. पुढे पुढे ही सलगी राहिली नाही तीही परिस्थितीमुळेच.

   माझ्या कंपनीतील वसाहतीत अरूण माझ्या शेजारच्या इमारतीतच रहायचा तेव्हा तो एकटा मी विवाहित होतो. त्याच्या विविध उद्योगांमुळे कल्याणला काकांकडे होणार्या फेर्यांमुळे त्याला थोडीशी मदत लागे. ती मी खुषीने करीत असे. आमच्या वर्तुळात अगोदरच पंजाबराव जाधव सदाशिव कोळी अनंत कुलकर्णी होतेच. आणखी त्यात दोघांची भर पडली पण ती पुढे. त्याकाळी आम्ही मित्रांच्या छोट्या सहली आयोजित करीत असू. गप्पांचे अड्डे जमवीत असू. मी जाधव मांडे पुस्तके वाचून त्यावर चर्चा करीत असू.  संदर्भ दुरूस्त होण्याचे अधिक माहिती संकलनाचे  काम त्यातून होई. जाधव मांडे यांचे वाचनही भरपूर होते. जाधव टेबल-टेनिस, लॉन टेनिसही खेळत. आम्हाला घेऊन जात. त्यांनी माझ्या हाती रॅकेट दिली खरी पण मला कधी तिचे प्रेम वाटले नाही. रक्तात नाही त्याला जाधव काय करणार होते ? अरूण मांडे तर कधी  क्लबात आल्याचेही मला आठवत नाही. सिगरेटचे झुरके घेत तो पुस्तके मासिके चाळत बसे आणि ते धडे चर्चा सुरू झाली की धनराशीसारखे आमच्यावर मनसोक्त उधळत असे.

   वि. दा. सावरकर, गो. नि., पु. भा., माजगांवकर, पु. ., माडगुळकर बंधु, विश्राम बेडेकर, दळवी, शांता शेळके, भाऊ पाध्ये, गं. भा. सरदार, पुरंदरे, स्वामीकार देसाई, प्र. के. अत्रे, ना. . इनामदार अशा अनेक नामवंतांची पुस्तके संग्रहित करून वाचण्याचा आम्हाला छंद होता. त्यावर गप्पा मारण्याचा शौक होता. ते आमचे छोटे संमेलनच होते असे म्हणायला हरकत नाही. गप्पात कुरघोडी करायला मिळावी, ज्ञान दाखवता यावे म्हणून मीही तयार असे. पण मांडे सारे मनापासून करी. त्याचे देशप्रेम, समाजप्रेम, जिव्हाळा ज्ञानही लोभस असे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर जीव टाकीत असू.

   सुरूवातीस छोट्या वर्तुळात होणार्या साहित्यिक गप्पांचा पुढे लेखक होण्यासाठी उपयोग झाला नाही तरी रसिक वाचक श्रोता होण्यासाठी ही वर्तुळे मदत करतात हे मला आज पटते. सहलीसाठी बाहेर गेल्यावरही ही पुस्तके आम्हाला साथ देत, आजही देतात. पण विशीतले वय, पु.लं. चा विनोद, माडगुळकरांची माणदेशी माणसे तसेच गीतरामायण, देसायांचे स्वामी, इनामदारांचे झुंज, झेप, मंत्रावेगळा, अन अशी अनेक पुस्तके त्यातील व्यक्ती हरघडी साथीला असता कारखाना त्यातले उत्पादन, कामगारांचे प्रश् . कमी महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यायला आम्हाला फुरसत नसे. आता वाटते की त्यावेळी व्यक्ती म्हणून आम्ही शिखरावर होतो. त्याला उतार पडायच्या आतच युवा कार्य घरच्या नव्या विश्वाची जाणीव यांत छंद गटाचा  राहता व्यक्तिनिष्ठ होत गेला.

   अगदीच परवा अरूण भेटला. त्याची मुले स्थिर झाली होती. शिक्षण संपत आले होते. पत्नीही तत्पर गृहकृत्यदक्ष असल्यामुळे अरूणचे बाहेरचे सारे काम बिनबोभाट चालले होते. चष्म्याच्या काचा वाचून जाड झाल्या होत्या. दिलखुलास हसणे अजून तसेच होते. अनेक ताण-तणाव समस्या यांनी त्या हसण्यावर विशेष परिणाम केला नव्हता. पाहून बरे वाटत होते.

   शेजारीच त्याचा कुत्रा होता. त्याला अपत्यप्रेम जास्त की श्वानप्रेम असा संभ्रम व्हावा इतका तो त्याचे लाड करीत होता. मी सहज म्हटले, अरूण अध्याय पुढे चालू आहे का?

   हो तर त्याने तत्परतेने उत्तर दिले. अध्याय चालूच रहावा. आपले जगायचे माध्यमच ते ! आपण असेच करू शकतो. दुसरा मार्ग नाही. कधी जिज्ञासा, कधी विरंगुळा तर कधी गरज म्हणून आपण या विश्वाकडेच पहावे इतके ते व्यापक, समृद्ध आणि दयाळू आहे. तो पुढे म्हणाला . ना. देशपांड्यासारखे समीक्षक काय म्हणतील कुणास ठाऊक पण आपल्या सारख्यांच्या रक्तात एकवेळ हिमोग्लोबीन कमी सापडेल, पण ज्ञानाचे कण मात्र सर्व शरीरभर पसरलेले सापडतील. हा एक चांगला रोग आहे. तो प्रत्येकाला व्हावा.

   थोडा वेळ का होईना राग,लोभ, मत्सर, क्रोध  या पासून सुटका होण्यासाठी अरूण मांडे यांना झालेला विकार आपणा सर्वांना व्हावा आणि शेवटचा दिस गोड होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात व्हावी असे बाकी मनापासून वाटते.

   आज अरूण आमच्यात नाही. अचानक हृदयविकारामुळे त्याचे जीवन संपुष्टात आले. आणखी एक माणिक सांडले.... पण मनातला अरूण अजून तसाच आहे. दिलखुलास अन् टवटवीत !

 

vvv

डॉ. . . टिळक

मी जी ट्रीटमेंट द्यायची ती दिली आहे परंतु हवा तो इफेक्ट होत नाही. औषधही बदलता येत नाही. आता एकच करा No Tomorow, only the day  काय ? जमेल ?”

क्षणभर मी धास्तावलो पण सावरून म्हणालो, डॉक्टर, तुम्ही सारे केलेत पण एक विचारू ?

तुम्हाला माहिती आहेे तुमचा Tomorrow ?”

छे ! कुणाला माहित आहे ? त्या बाबतीत आपण सारे एकाच तागडीत नाही का ?

   त्यांना वाटले असावे की मला धक्का बसेल ! घर, संसार, महत्त्वाकांक्षा, भौतिक सुखे यांच्या ओढीने वा लालसेने मी हतबल होईन. पण तसे काही घडल्यामुळे तेच अवाक् होऊन माझ्याकडे पाहत राहिले. मी सत्यच सांगत होतो.  एक रूग्ण असूनही मी डॉक्टरांकडे धीराचे बोलत होतो.

   त्याचे असे झाले की 1974 च्या सुमारास आमच्यावर दुहेरी संकट कोसळले. आमच्या त्यावेळी आठ वर्षाच्या असणार्या संतोषच्या मेंदूत (अपघातामुळे)  रक्तस्त्राव होऊन तो गंभीर आजारी झाला त्याच दरम्यान मला क्षयाने ग्रासले Miliary Tuberculosis असे या योगाचे नाव आहे पण हे निदान व्हायला दोन वर्षे लागली. त्या अगोदर फक्त इन्फेक्शन असे किरकोळ वर्गीकरण होऊन वेदनाशामकांचा मारा होत होता. 1976 साली मला सापडलेल्या ह्या देवदूताने तपासणीनंतर लगेच दीड महिन्यात त्याचे बारसे केले. उपाय सुरू केले. आजकाल टी.बी. बरा होतो. काळजीचे कारण नाही. हे फार भोंगळ विधान आहे. साधे सर्दी पडसे देखील तुमचा आठवडा सहज खाते. हा तर क्षय. त्यामुळे मी नियमितपणे डॉ. टिळकांनी केलेली औषध योजना अमलांत आणली. फरक पडला पण पूर्ण बरे वाटत नव्हते. थकवा नव्हता.  कामाचे तास 10-12 होते. आमच्या कंपनीची हरित चेंबूर योजना राबवण्याचे काम मी अशोक वैद्य करीत होतो.

   दिवसाला एक इंजेक्शन 22 गोळ्या खात होतो. आणि 1978 च्या सुमारास सुरवातीस वर्णन केल्याप्रमाणे एक दिवसाच्या जगण्यावार मी येऊन ठेपलो होतो. संतोषच्या गार्डिनल माझ्या आयनापास या गोळ्या शेजारी सुखाने नांदत होत्या.

   डॉ. टिळक मितभाषी होते. पण माझ्याशी ते बोलत. कदाचित अनुकंपेमुळे असेल पण शब्दांची थोडी देवघेव होई.  जे. जे. रूग्णालयात ते यूरॉलॉजी विषयाचे प्राध्यापकही होते.  त्यांची वेगळी कन्सल्टिंग रूम होती. आम्ही त्यांच्या भेटीसाठी जेव्हा जेव्हा जात असू, त्या त्या वेळी तेथे अनेकजण रांग लावून बसत. भेट पूर्व आयोजनानेच होत असे. आपल्या क्रमांकाच्या वेळी आत जायचे. नमस्कार चमत्कार करायचा आणि त्यांचेच स्वास्थ्य कसे आहे हे विचारायचे. या थोड्या आगावूपणामुळे ते थोडे बोलायचे. पण मोजकेच. एखादा फोन मध्येच यायचा. त्यात इतर डॉक्टर्स  एखाद दुसरा रूग्ण यांचाच तो असायचा. ते ज्यावेळी बोलत नसत त्यावेळी नजर आजुबाजूला वळे. शेजारच्या कपाटातील संदर्भग्रंथ काही नियतकालिके दिसत. गणेशाची मूर्ती त्यावर रक्तपुष्पे दिसत. मधूनच त्यांचा सहाय्यक नवीन येणार्या रूग्णांची चिठ्ठी टेबलावर ठेवताना दिसे. बस ! तिथे एवढीच वर्दळ त्यात डॉक्टरांचे मोजके निरूपण.

पाच वर्षाच्या काळात डॉक्टरांशी थोडा परिचय वाढला. त्यात त्यांची काही कामे मी केली. दरवर्षी आठवणीने त्यांचे अभिष्टचिंतन करीत राहिलो. आजही करतो. त्यांनी 4-5 वेळा मला सिस्टोस्कोपी करण्यासाठी बोलावून घेतले. सकाळी सात वाजेपासून दुपारपर्यंत ऑपरेशन्स करणारे डॉक्टर मध्येच यूरोलॉजीची लेक्चर्स करून येत. सायंकाळी 4 ते 7 कन्सल्टिंग करत कधी रूग्णांना हॉस्पिटलात जाऊन भेटत. सारे कामच  मुळी आपल्या विषयाशी संबंधित असे. त्यामुळे परिपूर्णता येण्याची कसोटी तर त्यांनी उत्तम प्रकारे पार केली होती. आजही गरजू रूग्णांना मी त्यांच्याकडे आवर्जून पाठवतो कारण कामातील सफाई सचोटी याबद्दल मला कधीच शंका नसते.

जेव्हा जेव्हा मी अनेक कामानिमित्त महर्षि कर्वे रोड वरून मुंबईला जातो. त्या त्या वेळी रस्त्यावरून सहज दिसणारी डॉ. . . टिळक ही पाटी मला दिसते. पुनर्जन्माचे प्रत्यंतर याच जन्मी आणून देणार्या ह्या डॉक्टरांचा चेहरा मी आठवतो. मृदु अन् मितभाषी असणारे डॉ. टिळक मी नेहमीच (Next to God) देवा सारखे मानत आलो आहे, याबद्दल मनोमन सुखावतो.

No comments:

Post a Comment