Thursday, November 12, 2020

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ३, ४: जयसिंग सोलंकी , जी. रामास्वामी : श्री. बलबीर अधिकारी

 


जयसिंग सोलंकी


   तुर्भे खत कारखाना 1965 साली सुरू झाला. त्या दरम्यान वेगवेगळ्या पदांवर रूजू झालेल्या मंडळीने आता आपला सेवाकाळ संपवला आहे. या प्रदीर्घ काळात ज्यांचा विविध अंगानी विकास झाला त्यात जयसिंग सोलंकी यांचे नाव पहिल्या काही नावात येऊ शकेल.

   आम्ही एकत्र यायला चेंबूरचे यूथ कौन्सिल प्रामुख्याने कारणीभूत ठरले. या युवा संस्थेत अशोक वैद्य, सदाशिव कोळी, अनंत कुलकर्णी मी यांच्याबरोबर सोलंकी यांचा वाटाही महत्त्वाचा होता. संस्था नोंदणी करणार्या सात जणात तेही होते. शिवाय अनेक वर्षे त्यांनी संस्थेचे हिशेब सांभाळले संस्थेचे व्यवहार सुरळीत राहावेत यादृष्टीने आग्रह धरला. झालेल्या प्रत्येक प्रकल्पावर जेव्हा चर्चा होई त्यात ते अनेक ठिकाणी काटकसर सुचवीत. ठरलेल्या रकमा रीतसर वेळेवर देत आणि हिशेबही मागत. वेळप्रसंगी वाद होई. पण या सर्वांचा परिणाम चांगला होऊन संस्थेचे बाळसे वाढे विश्वासार्हता कायम राही. आज आम्ही स्थापन केलेली संस्था 43 वर्षांची झाली आहे, त्याचे श्रेय इतर कार्यशील जागृत कार्यकर्त्यांप्रमाणे सोलंकी यांचेही आहे. त्यांचे थोडे अधिक एवढ्यासाठी की, ते अगदी सुरूवातीपासून होते त्यांच्या सचोटीमुळे संस्थेला अनुभव मिळायला कार्यक्षेत्र विस्तारायला अवधी प्राप्त झाला. अन्यथा इतर अनेक नामशेष झालेल्या संस्थांसारखी आमचीही गत होऊ शकली असती.

   सोलंकींनाही वाचनाची भरपूर आवड आहे. प्रथितयश, प्रगत नवे करून दाखवणार्या साहित्यिकांची अनेक पुस्तके त्यांनी हाताळली आहेत. स्मरण चांगले असल्यामुळे ते गप्पांच्या ओघात अथवा व्यासपीठावर, वाचलेले सहज उद्धृत करून श्रोत्यांना खूष करू सोडतात. वक्तृत्वाचे लेणेही त्यांच्या अंगावर आहेच. भरपूर माहिती, स्पष्ट वाणी अंतरंगातील कळकळ यामुळे सोलंकी खासगीत वा जाहीर कुठेही बोलले तरी लोभस वाटतात. आमच्या संस्थेत जे साहित्यिक येऊन गेले त्यात .पु., व्यंकटेश माडगुळकर, .मा.मिरासदार, शंकर पाटील, शन्ना, विं.दा.करंदीकर, मंगेश पाडगांवकर नारायण सुर्वे . यांचा समावेश होता. त्या सार्यांशी गप्पा मारतांना त्यांची कळी खुले. सार्थकतेचा आभास आम्हाला प्रतीत होई. साहित्यिकांनाही खरा रसिक भेटल्यासारखे वाटे. आमचे कार्यक्रम छान होत. अशोक वैद्य सोलंकी यांच्या कामावर अशावेळी आम्ही फार खूष होत असू आणि तो आनंद आमच्या अनेक चाहत्यांनाही अनेक दिवस पुरे.

   1971 साली झालेल्या बांगला देश युद्धाच्या वेळी नागरी संरक्षण हा महत्त्वाचा विषय होता. गरजही मोठी होती. आमचा कारखाना रिफायनरी शेजारी अणुशक्ती केंद्राच्या टापूत आहे. त्यामुळे औद्योगिक नागरी सुरक्षा हा स्वतंत्र विभाग होता. नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावयाचे होते. आमच्या संस्थेने यात उतरून जबाबदारी स्वीकारली. प्रथम आमचे लोक प्रशिक्षित केले इतरांसाठी प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणाची जबाबदारी आमच्याबरोबर राहून सोलंकीनी उत्कृष्टपणे पार पाडली दोन महिन्यात 10,000 ची वस्ती 34 शाळातील जवळजवळ 20 हजार विद्यार्थी या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित झाले. खत कारखान्याचे व्यवस्थापन कर्मचारी तसेच विविध संस्था यांनी यूथ कौन्सिलची प्रशंसा केली.

   पुढे कंपनीतील अधिकार्यांच्या संघटनेकडे सोलंकी ओढले गेले. तसेच स्थानीय लोकाधिकार समितीचे कामही ते पाहू लागले. पण मूळचा यूथ कौन्सिलचा पॅटर्न त्यांची सतत साथ करीत राहिला त्याच्या नेरूळ, वाशी, अलिबाग या शाखांनाही त्याचा लाभ होत राहिला.

   परफेक्शन (परिपूर्णता) हा त्यांचा नेहमीचा ध्यास राहिला आहे. रस्त्यावरचा प्रकल्प असो, हिशेब असोत, साहित्यचर्चा असो वा व्यावसायिक सुरक्षा व्यवस्थापन असो, सोलंकींनी आपल्या अभ्यासू वृत्तीने अनेक ठिकाणी छाप पाडली आहे. आज ते औद्योगिक सुरक्षा स्वास्थ्य या विषयाचे जाणकार मानले जातात. कारखान्यांतील धोक्याच्या, प्रसंगी परस्परांना मदत देण्यासाठी असलेल्या योजनेचे ते सभासद आहेत, तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही त्यांना नावाजलेले आहे.

   आज आम्ही  कधीमधी भेटतो. पूर्वीसारखे व्यवसायिक अनुभव कार्य यासंबंधी चर्चा करायला जमत नाही. तथापि कधी कधी साहचर्याऐवजी दुरून कानी येणारे नाद त्याचे अंतरंगात उठणारे पडसाद यांनीच भावजीवनाच्या सीमा ठरतात. आमच्या कानावर नाद येतात ते सोलंकी आपल्या कामात गर्क असल्याचे. ते जे करीत असतील त्यामुळे चार गरजूंचे भलेच होईल असा विश्वास वाटण्याइतके सोलंकी बसलेले पारडे नक्कीच जड आहे.

vvv


जी. रामास्वामी


   घरीच कांजी केलेले आणि चोपून इस्त्री फिरवलेले कपडे, केसांचा उलटा भांग सेंच्युरी रेयॉनमधील अनुभवाने आत्मविश्वास आलेला चेहरा असलेला रामास्वामी प्रथम मला भेटला तो तुर्भे खत कारखाना सुरू व्हायच्या आधी झालेल्या प्रचालक भरतीच्या गर्दीत. आमच्या निवडीचा निकष मुख्यत: मराठी भाषिक असा होता; परंतु सिंद्रीमध्ये प्रशिक्षित झालेले 100 उमेदवार नांगल, गोरखपूर कोटा येथील खत कारखान्यातून आलेले विविधभाषी कर्मचारी . मुळे आमचा कारखाना म्हणजे बहुभाषी बहुप्रांतियांचे संमेलनच होते. त्यात सान्निध्य, स्वभाव सेक्शनवार विभागणी यामुळे त्यातही गट, उपगट असत. एकमेकांत मिसळण्याची त्यातून काम उभे करण्याची गरज सर्वांनाच असे. कारखाना अद्याप सुरू व्हायचा होता. विविध विभागातील पंप्स, कॉम्प्रेसर्स, व्हेसल्स, लेव्हल टेंपरेचरची मीटर्स त्यांना कंट्रोल करणारे व्हॉल्व त्यांचे कंट्रोल रूममध्ये गेलेले इम्पल्स नियंत्रण, वायू द्रव वाहून नेणार्या पाईपलाईन्स त्यावर असणारे आयसोलेशन व्हॉल्व . ची जाण माहिती यांचा अभ्यास सुरूवातीस आवश्यक होता. तो करण्याचा कामचुकार प्रयत्न अनेक जण करीत. परंतु रामास्वामी सच्चा होता. कुणी नसले तरी तो आपल्या अभ्यासात गर्क असे.

   मलाही या अभ्यासाची गरज होती. कॉलेजमधून बाहेर आल्यावर शिकवण्यासाठी काही काळ घालवल्यावर तरी जड उद्योगात मी प्रथमच आलो होतो. उत्पादन क्षेत्र नवीन होते त्यातही हा कारखाना मोठा होता. अभियांत्रिकी तपशील खूपच होते. त्यांच्याशी ओळख असणे हे कामातील सफाई सुरक्षितता या दोन्ही दृष्टींनी आवश्यक होते. थोडी भीतीही वाटत होती. हैड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर डाय ऑक्साइड, कार्बन मोनो डाय ऑक्साईड, हैड्रोजन सल्फाईड या विषारी स्फोटक वायूंची संगत होती. त्यामुळे मीही अशा सवंगड्याच्या शोधात होतो की ज्याला थोडे अधिक कळते; तो बेपर्वाई करीत नाही तोरा मिरवीत नाही. रामस्वामी असाच शांत, सोज्वळ सहकार्यांना सांभाळून घेणारा होता. त्यामुळे मी त्याच्याशी दोस्ती वाढवली. त्याच्याबरोबर फिरू लागलो. नवीन शब्द संज्ञा शिकू लागलो. फ्लो शीट, इंजिनीअरिंग ड्रॉईंग वाचू लागलो. अमोनिया सयंत्र कार्यान्वित व्हायच्या अगोदर रामास्वामीने मला प्रचालक पदाला लायक बनवले ते या प्रशिक्षणातून माझी तयारी पूर्ण करूनच !

   एकाच गटात असल्यामुळे आम्ही घरीही भेटत असू. घर म्हणजे वसाहतीत कंपनीतर्फे मिळालेले ब्लॉक्स. रामास्वामीचे घर नीटनेटके असे. चादरी स्वच्छ स्वयंपाकाची भांडी लख्ख असत. पंख्यावर धूळ नसे. रोज स्वयंपाक करी. कधी मलाही सांबार-भात खाऊ घाली.

   रामास्वामी एकटा राहायचा. सारे स्वत: करायचा. पगारातून दर महिन्याला मनीऑर्डर करून घरी पैसे पाठवण्याच्या माझ्या सवयीला त्याने बळकटी आणली. स्वावलंबी काटकसर यांचे त्याचे वळण चांगले होते. वक्तशीर असलेला रामास्वामी कामावर वेळेच्या आत उपस्थित असे. या त्याच्या सार्या गोष्टी मला भावत. परदेशी राहायचे म्हटले तर "स्वयमेव मृगेंद्रता" हवी असते. ती त्याच्याकडे होती. त्यामुळे तो मला आवडे. संधी मिळाल्यावरही तो आपले काम इतरांना कधी सांगत नसे. नियमित आयुष्य जगणे संयमन करणे त्याला सवयीमुळे जमत असावे.

   काळ कंठण्यासाठी अशीच माणसे उपयोगी पडतात. त्यांच्या जीवनक्रमाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले की एकटे जगायची वेळ आली तरी अशा सवयी तुमचे मोठे काम करतात. मन विचलित होऊन बहकणे होत नाही. एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वत:ची आबाळ करणे वेगळे आणि विस्कळीत, असंस्कृत जगणे वेगळे. दगड घडवावा लागतो तसा माणूसही. एकाएकी तयार माणूस हाती लागणे अशक्य आहे. त्याच्यासाठी कुणी खपले असेल तरच तो समाजाच्या दृष्टीने लायक बनतो.

   रामास्वामी सालस,सरळ सच्छील होता. त्याने नंतर कंपनी सोडली; पण आपल्या आठवणी सवयीमुळे त्याने आम्हाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे.


No comments:

Post a Comment