Saturday, November 13, 2021

चांगल्या विचारांचा दिवा.... 🙏🏻🙂

चांगल्या विचारांचा दिवा.... 🙏🏻🙂

दीपोत्सवाच्या  निमित्याने "चांगले विचार "रुजवायचा छंद लावण्याचा एक दिवा नक्की लावा 👍👍👍

माझ्या सर्व छंदांमध्ये हा छंद माझ्या सर्व अडचणीनं मधे खूप कामाला आला ...येत आहे.

जीवनात यशस्वी व्हायचंय कीं स्थिरता हवी!!... ह्यावर विचार केला... चांगल्या विचारांनी स्थिरता तर येतेच पणं तब्बेतही सुदृढ  रहाते,हें लक्षात आलं आणि स्थिरता महत्वाची वाटली आणि तेव्हापासून जास्त प्रगती झाली.. होतं आहे 😊कारण निरीक्षण केल्यावर लक्षात आलं कीं....सौंदर्य, आपले स्किल,आर्ट, प्रसिद्धी, पैसा अर्थात सर्व बाह्यगोष्टींसाठी यश मिळावं म्हणून त्यांच्या मागे धावत रहातो आणि हें सर्व काही काळापुरताच टिकणारं आहे ( वय  झालं कीं सौंदर्य कमी होतं, स्किल जमेनासे होतात, प्रसिद्धी कायम कधीच नसते, पैसा सर्वकाही नसतोच!! )मात्र आपले चांगले विचार अर्थात माझा हा छंद , ह्या जन्मी शेवटपर्यंत साथ तर देणारच आहें पणं पुढल्या जन्मी देखील कामाला येणार आहे.कारण सोबत चांगले संस्कारच घेऊन जाता येतात 🤩

लोंग आईना भी नहीं देखते, अगर आईने में चित्र की जगहं चरित्र दिखता!!!

खरंय नाही!! "उत्तम विचार - उत्तम संस्कार - उत्तम चरित्र "...चांगले विचार म्हणजेच Right thiking, करायची सवय लावून घ्यावी लागते.... खूप चांगल ऐकलं, खूप वाचन केल्याने बदल घडत नाहीत तर त्याप्रमाणे चिंतन करून,ठरवून वागलं तर बदल घडतात....

 Attention goes... Energy flows... Things grows. किती बरोबर आहे नाही !!✔️✔️✔️

जसं पाणी सतत वाहत राहायला हवं, रक्त सतत फ्लो होतं राहिलं पाहिजे तसेच विचारही बदलले पाहिजे!!... पाणी साचले कीं किडे पडतात वास येतो.... रक्त फ्लो व्हायचं थांबलं कीं गाठी तयार होऊन रोग निर्माण होतात,अगदी त्याप्रमाणेचं तेच तेच चुकीचे विचार डोक्यात ठेऊन आपण रोग निर्माण करत असतो.

मी बघत असते लोकं किती छोट्या छोट्या गोष्टींचा राग डोक्यात ठेऊन जगत असतात 😔 असंही म्हणतात,आजकाल विसरायला फार होतं मात्र  जुना राग असेल तर , तो मात्र विसरत नाही 🤩मज्जा आहे नाही !! Let go करून मोकळं व्हायचं नं!! नाही ते डोक्यात ठेऊन अख्ख आयुष्य घालवतात 😂

स्वास्थ म्हणजे काय?? तर स्व मधे स्थित रहाणे....जितके रिलॅक्स राहू तेव्हडे निरोगी राहू... अगदी साधं सुधं गणित आपणच अवघड करून ठेवलंय.... मग हें सोडवणं चांगल्या विचारांच्या छंदानं मुळे नक्कीच शक्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा छंद जोपासायला सुरवात केलीये  results मिळतांना बघून शेअर करावेसे वाटले 😍.... ह्या छंदामुळे आपण काहीही कारण नसतांनाही आनंदी रहातो🤗 शेवटी आयुष्यात आनंदच हवा असतो ना!! आनंदासाठी  किती खटाटोप चालू असतो सर्वांचा... गाडी हवी, बंगला हवा, सोनं.. चांदी, यश (हल्ली तर ड्रग्स पणं घ्यायला लागलेत 😔) वगैरे वगैरे आणि हा आनंद थोड्याच काळापुरता असतो बरं!!😔 मग माझा हा छंद नक्कीच मस्त नाही का??free of cost 😂चांगल्या विचारांवर आनंद आणि सुदृढ तब्येत फ्री 👏

चांगले विचार करा आनंद मिळवा 💃💃💃

आनंदी रहाण्यासाठी दुसरी साधीसोपी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे नाहीये तेच आपल्याला हवं असतं जे दिलंय त्याची कदरच नसते😔... मी ठरवून टाकलंय, परमात्म्याने जे दिलंय त्याचे धन्यवाद मानतं रहायचे 🙏🙏🙏करून बघा... खूष रहाल 😍

टेन्शन येतय... आजारी पडताय.... डिप्रेशन येतय... चेहरा काळवंडलाय... एकटेपणा वाटतोय... वजन वाढतंय...झोप येत नाहीये... चिडचिड होतेय... मित्र मैत्रिणी नाहीत... स्वतःला ग्रेट समजत आहात कीं स्वताहात कमी पणा वाटतोय..... ह्या सर्वांना एकचं सोल्युशन.... चांगलें विचार करायचा छंद लावा आणि सकारात्मक लोकांमध्ये राहून आरोग्य संपूर्ण आयुष्य जगून  रोज दीपोत्सव साजरा करा 😍


- प्रतिभा चौधरी ( Source : Social Media)

Saturday, October 30, 2021

मिट्टी वाले दीये जलाना..अबकी बार दीवाली में !!

 



राष्ट्रहित का गला घोंटकर,

                     छेद न करना थाली में...

मिट्टी वाले दीये जलाना,

                    अबकी बार दीवाली में !

देश के धन को देश में रखना,

                      नहीं बहाना नाली में..

मिट्टी वाले दीये जलाना,

                   अबकी बार दीवाली में !

बने जो अपनी मिट्टी से, 

                  वो दिये बिकें बाज़ारों में...

छुपी है वैज्ञानिकता अपने,

                     सभी तीज़-त्यौहारों में !

चायनिज़ झालर से आकर्षित,

                     कीट-पतंगे आते हैं...

जबकि दीये में जलकर,

                बरसाती कीड़े मर जाते हैं !

कार्तिक दीप-दान से बदले,

                   पितृ-दोष खुशहाली में...

मिट्टी वाले दीये जलाना...

                 अबकी बार दीवाली में !

मिट्टी वाले दीये जलाना...

                 अबकी बार दीवाली में !

कार्तिक की अमावस वाली, 

                 रात न अबकी काली हो...

दीये बनाने वालों की भी,

                खुशियों भरी दीवाली हो !

अपने देश का पैसा जाये,

                अपने भाई की झोली में...

गया जो दुश्मन देश में पैसा,

                लगेगा रायफ़ल गोली में !

देश की सीमा रहे सुरक्षित,

               चूक न हो रखवाली में...

मिट्टी वाले दीये जलाना...

               अबकी बार दीवाली में !

मिट्टी वाले दीये जलाना..

             अबकी बार दीवाली में !

 

(स्रोत व्हाट्सअप )

Saturday, August 28, 2021

थोडी गंमत, थोडा भाषाविलास: विरोधाभासी शब्दप्रयोग - शशि थरूर

 


थोडी गंमत, थोडा भाषाविलास: विरोधाभासी शब्दप्रयोग  -   शशि थरूर

 

            माझ्यासारख्या राजकारण्याला  oximoron म्हणजे विरोधाभास  या अलंकाराच्या उपयोगाची नीट ओळख असणे फारच आवश्यक आहे. वरवर परस्परविरोधी असणारे शब्द यात एकत्र योजिलेले दिसतात. आता हेच वाक्य पहा.

“ पक्षनेत्याबद्दलची आपली  अविचल निष्ठा शपथपूर्वक प्रकट करत असतानाच आपल्याला अन्यत्र कुठे अधिक चांगली  संधी लाभते आहे का याकडे त्याची नजर लागून राहिली होती. पण त्याच्या खरोखरीच्या ढोंगाला त्या फसल्या.” (यात खरोखरीचे  ढोंग हा विरोधाभास होय.)

 

         Oximoron हा शब्द oksus  आणि moros या दोन ग्रीक शब्दांपासून निर्माण झाला. Oksus म्हणजे टोकदार आणि moros म्हणजे मंदबुद्धी, येडबंबू. अर्थात कोणताही विरोधाभास अलंकार ठरायचा तर दोन विरोधी शब्दांची मिळून झालेली रचना अर्थपूर्ण असायला हवी. नुसते Black White असे दोन शब्द एकत्र आल्याने काही लोक वाहवा करत दाद देणार नाहीत. पण आपण मि. व्हाईट नावाच्या एखाद्या कृष्णवर्णीय माणसाबद्दल हे शब्द वापरले तर मात्र तो गमतीशीर विरोधाभास ठरेल.

 

         खरं सांगायचं तर विरोधाभासाचा वापर आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूपच जास्त प्रमाणात होतो. एखादी व्यक्ती एखाद्या अनपेक्षित ठिकाणी गेलेली असेल तर अनेकदा आपण तिला "अगदी सहजपणाचा देखावा कर हं"  असं सांगतो. Act naturally! आता आपण सहज असलो तर त्याचा देखावा कशाला करावा लागेल? अभिनय करणे आणि नैसर्गिक वागणे हे परस्परविरोधी नाही काय? पण हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण रीत्या एकत्र आणले की झाला विरोधाभास. कितीतरी ज्ञानी वाटणाऱ्या माणसांनी तुम्हाला एखादे उघडे गुपित ( open secret) सांगितलेले असेल. गुपित आहे ते उघडे  कसे बरे? आणि खिडकीतल्या कारकूनाने कितीतरी वेळा तुमच्याकडे “मूळ प्रत” मागितली असेल. :-)

किंवा तुम्हाला हव्या असलेल्या सेवेच्या एकूण खर्चाबद्दल बोलताना समोरच्याला एकूण  खर्चाचा  “ नेमका अंदाज” सांगा असे तुम्ही  म्हणता. हे सारे विरोधाभास होत. कारण यातला एक शब्द पाहिलात तर तो  दुसऱ्याच्या अगदी विरोधी अर्थाचा आहे आणि तरी  त्या दोन्हींचा मिळून होणारा एकच  अर्थ समोरच्याला निःसंदिग्धपणे कळतो.

 

      एकदा मी cattle class असा शब्द विमानाच्या सामान्य दर्जाच्या प्रवासासाठी वापरला. राजकारणी आणि माध्यमपटु यांनी त्यावेळी माझ्यावर एकच हल्लाबोल केला. माझ्या म्हणण्याचा त्यांनी विपर्यस्त अर्थ घेतला होता. शब्द तेच वापरले होते मी पण माझ्या टीकाकारांना वाटला तसा त्यांचा अर्थ नव्हता. एकदा एका निवासी शाळेत हजेरी घेण्यात आली तर एक मुलगी हरवल्याचे आढळले ( found missing).  हा  तसा विरोधाभास होता पण शालेय प्रशासनाच्या दृष्टीने तर  ती एक भयावह समस्या होती. (मुलगी हरवली होती. कुठे आहे ते आढळून येणे गरजेचे होते. ) मुलांच्या वसतिगृहात अर्थातच मुलींच्याबद्दल बरंच बोललं जात असतं.   तऱ्हेतऱ्हेचे उथळ शेरे मुलींवर मारले जात असतात. त्यातल्या अनेकांत विरोधाभास दिसून येतो. “ कसली भारी कुब्जा दिसते बघ.” ( pretty ugly) “ काय भयानक सुंदर आहे नाही?”( awfully beautiful)   “ ती अगदी barely dressed आहे.”  bare की dressed? :-)  मुली मात्र एव्हढया उथळ नसतात. त्या आपल्या परिचयाच्या मुलांचं वर्णन करताना वेगळ्या प्रकारचे विरोधाभास वापरतात. उदाहरणार्थ एखाद्या चे वर्णन करताना " तो  seriously funny आहे." असे म्हणतात. किंवा मग  “ तो भयंकर चांगला आहे ग. ” ( terribly fine )

 

            विरोधाभासाचे स्वरूपच असे आहे की त्याचा उपयोग हलक्या विनोदनिर्मितीसाठीही  केला जातो. प्रत्यक्षात विरोधी नसलेले दोन शब्द एकत्र आणले जातात आणि त्यात विरोधाभास नसताना विनोदनिर्मितीसाठी विरोधाभास असल्याचे भासवले जाते. यात विनोद हाच असतो की प्रत्यक्षात विरोधाभासी  नसताना ती शब्दजोडी तशी मानली जाते. काही ब्रिटिशांना विचाराल तर अमेरिकन संस्कृती हा एक विरोधाभास आहे. वदतोव्याघात हा यासाठी योग्य शब्द होईल.  ( अमेरिकेची? ती आणि कसली संस्कृती?) अमेरिका जगभर आपले वजन टाकत  रहायची ना तेव्हा ugly American असा शब्दप्रयोग होई. त्याकाळात काही समीक्षक कठोरपणे म्हणत की अमेरिकन डिप्लोमसी ( अमेरिकेची मुत्सद्दी राजनीती) हाही असाच एक विरोधाभास आहे. याला प्रत्त्युत्तर म्हणून बरेच  अमेरिकन मुत्सद्दी United Nations हाच एक विरोधाभास आहे असे म्हणत. ( कारण एकी तर नव्हतीच) स्पेल्लिंग्ज auto-correct  होत नव्हती तेव्हा United Nations बऱ्याचदा Untied Nations  ( धरबंध नसलेल्या राष्ट्रांचा समूह) असे छापले जाई! ( typos कधी कधी असे सत्यदर्शी होतात.)

 

         लष्कराला  सुद्धा विरोधाभास परका नाही. ते लोक friendly fire म्हणतात. आपल्याच सैनिकांचा  यात पाडाव होतो. firing पण friendly! काही छद्म बुद्धिवादी जरा जास्तच आगाऊपणे military intelligence हाच एक वदतोव्याघात आहे असे म्हणतात. प्रामाणिक सैनिकाला काही विचारच करता येत नाही ही खोटी  प्रतिमा त्यांना दृढ करायची असते. आपल्या देशासाठी शिर तळहातावर घेऊन युद्धावर जातात ते मंदबुद्धीच  असतात असा उपहास त्यांना करायचा असतो. ( मराठीत गुढघ्यात मेंदू म्हणतात. हा उपहास अर्थातच त्याज्य आहे.) पण लष्करी संदर्भातला याहून वाईट विरोधाभासी शब्द आहे सिव्हिल वॉर. नागरी युद्ध. मला सांगा युद्धाइतकी  uncivil ( असभ्य, असंस्कृत, अनागरी ) गोष्ट दुसरी कोणती असेल? आमचे कित्येक  सैनिक मागतात ना त्या सैनिकी सेवेतून निवृत्तीसाठी असलेला शब्द मात्र खराखुरा मजेदार विरोधाभास आहे. त्याला म्हणतात active retirement! क्रियाशील निवृत्ती!

 

           काही दोषैकदृष्टीचे लोक असे म्हणत असावेत की ‘प्रामाणिक राजकारणी’ हाही एक वदतोव्याघातच आहे. यावर  राजकारणी business ethics ( व्यावसायिक नीतिमत्ता) हाच  वदतोव्याघात असल्याचा टोला देतील. शैक्षणिक टेलिव्हिजन या शब्दप्रयोगाला अनेक लोक कायच्या काय नाव म्हणून हसतील.

 

          कॉम्पुटर वापरून वापरून डोकं पिकलेल्या माणसांना त्यांच्या दैनंदिन अनुभवातील एखादा विरोधाभास किंवा वदतोव्याघात सुचवायला सांगून पहा. बरेचजण पटकन म्हणतील, “मायक्रोसॉफ्ट वर्क्स” ! तुमच्याकडे चालते का हो मायक्रोसॉफ्ट?

 

              -   शशि थरूर

  - (खलिज टाईम्स 15 जुलै 2021)

      भाषांतर : अनंत घोटगाळकर