बोलावे ऐसे, न व्हावे जे रटाळ, 🥱
नेमकेच वदावे, का ठरावे वाचाळ !! 🤬
लिहावे ऐसे, मांडावा मतितार्थ, 🎯
कमी,अचूक शब्दांत, उतरवावा अर्क !! 💧
ऐकावे ऐसे, की समजून घ्यावे,😊
प्रतिक्रिया टाळुनी, प्रतिसादा द्यावे !!😇
वर्तावे ऐसे, जे बोलू ते चालावे, 😎
गदारोळ टाळुनिया, जगा शांतवावे !!😇
ऐसे गुणदर्शने, जनी जनी वाढितो सन्मान,🙌🏽
अपेक्षित फलश्रुती,अपेक्षित परिणाम !!🎯
- रुपाली
No comments:
Post a Comment