भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे निमित्त साधून, SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा. लि. नासिक आणि अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन, नासिक यांचा संयुक्त उपक्रम "अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा"
१) स्पर्धा गट :
गट १: रुजवात अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा : १० ते १७.
गट २: बोधी अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा : १८ पासून पुढे
गट ३: तीचे अर्थभान (महिलांसाठी फक्त) : वयोमर्यादा : १८ पासून पुढे
२) अपेक्षित
अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशनच्या ब्लॉगच्या संकेतस्थळावर वरील तीन गटांसाठी लेख दिलेले आहेत.
१) तुमच्या गटासाठी असणारा लेख (मराठी किंवा इंग्रजी पैकी कोणताही एक ) स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून, त्याचा फोटो २५ जुलै २०२२, च्या आत alparambha@gmail.com या ईमेलवर पाठवायचा आहे. ईमेल च्या विषयामध्ये "हस्ताक्षर स्पर्धा" असा उल्लेख करावा. परीक्षणा दरम्यान हस्ताक्षर, मांडणी, सजावट हे मुद्दे पाहिले जातील.
२) सोबत तुमचा आधारकार्ड फोटो / इतर जन्मतारीख दर्शविणाऱ्या अधिकृत कागपत्राचा फोटो पाठविणे बंधनकारक !
“चक्रवाढ व्याज” हा गणिती शब्द
आपल्याला इयत्ता आठवीमध्ये गाठतो. हे नाव आणि त्याचा गणिती फॉर्म्युला वाचला ना की
बऱ्याच मुलाना धडकीच भरते बर का !! या संकल्पनेचा बागुलबुवा उभा ठाकतो समोर आणि मग
ह्या साध्या, सोप्या
संकल्पनेची भीतीच वाटायला लागते. तर आज आपण जरा, याच बागुलबुवाचा समाचार घेउयात.
एक
गोष्ट सांगते तुम्हाला. एका गावात, अतिशय उत्कृष्ट गायन करणारे दोन गायक रहात असत.
त्यांची नावे होती वीरसेन आणि तानसेन. त्या गावाच्या राजदरबारी, राजगायक
म्हणून कोणाची नियुक्ती करावी हे ठरविण्यासाठी, त्या
गावाच्या राजाने,
या दोघांच्यात गायन जुगलबंदीचे आयोजन केले. जो
सरस ठरेल, तो
अर्थातच भावी राजगायक होणार होता! निर्णायक सभेमध्ये, दोघांनीही
उत्कृष्ट असे गायन सादर केले. राजा अतिशय प्रसन्न झाला. परंतु त्याला प्रश्न पडला
की शेवटी निवड कोणाची करावी? मग त्याने एक युक्ती केली. दोघांनाही बक्षिसी मागायला सांगितली. वीरसेनने खुश होऊन
१०० पोती धान्य मागितले. राजाने ती मागणी तत्परतेने मान्य केली. वीरसेनचे कल्याण
झाले म्हणून सगळे दरबारी आनंदून गेले. तानसेन मात्र अधिक चतुर होता. तो राजास
म्हणाला, “मला
आज तांदुळाचे फक्त दोन दाणे द्या. मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी, मागील
दिवसाच्या दुप्पट दाणे,
माझ्या धान्य कोठारात जमा करण्यात यावे.”
त्याची ही मागणी ऐकताच, दरबारी
लोक त्याला हसू लागले !! त्यांना वाटले, की मागून मागून काय मागितले तर तांदुळाचे फक्त
दोन दाणे !! पण चाणाक्ष राजाने मात्र खूष होऊन ती मागणी मान्य केली आणि मनोमनी तानसेनची, राजगायक
म्हणून नियुक्तीही करुन टाकली.
प्रजेच्याही लक्षात यावे, म्हणून राजाने तानसेनच्या धान्य कोठारात, रोजचे तांदूळ दाणे पोहचविण्यास सुरुवात
केली. पहिल्या दिवशी २,
मग ४, मग ८, १६, ३२, ६४.....असे होता होता, काही
काळातच, कोठारात
पोत्यांनी धान्य जमा व्हायला सुरुवात झाली !! आणि बघताबघता १०० हून अधिक पोती
धान्य जेव्हा जमा झाले,
तेव्हा तानसेनने हे दान थांबविण्याची विनंती
केली!! हे सर्व प्रजेच्या लक्षात येताच, राजाने तानसेनच्या नियुक्तीची घोषणा केली !!
रुजवा हे मनो-Money: "Effect of Compounding" म्हणजेच चक्रवाढ पद्धतीपासून अधिकाधिक लाभ मिळणेसाठी, बचत किंवा गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करा !
For the children, the first step in
understanding value of saving is to learn to distinguish between wants and
needs. They should understand that needs include the basics, such as food,
shelter, basic clothing, healthcare, and education. And that wants are all the
extras—from movie tickets and candy to designer sneakers, a bicycle, or the
latest smartphone.
The venerable piggy bank is a
useful savings vehicle for younger children, but when they hit elementary
school, they need to consider opening a saving account at an actual bank. It’s
a good way to install the importance of gradually building up their balance,
and it gives children an introduction to the banking industry.
Research suggests that many parents
are reluctant to even talk about money with their kids. A 2021 survey by T.
Rowe Price found that 41% of parents avoided those conversations. To teach
healthy behaviors regarding money, moms and dads have to find a way to discuss
the subject in the home.
जर एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला, भले कारण आजार असो किंवा अपघात, रुग्णालयाचा अनपेक्षित , अकल्पित असा खर्च उभा राहतोच ! अशा खर्चाची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम अथवा आरोग्य विमा हे साधन उपलब्ध असते. परंतु त्यापापसुन अपेक्षित लाभ मिळण्यासाठी, या विम्याच्या बाबतीत काही सजगता बाळगणे जरुरी असते. आपण सर्वांनी, मेडिक्लेम पॉलिसी बाबत पुढील काळजी नक्कीच घ्यावयास पाहिजे.
मेडिक्लेम पॉलिसी मध्ये आपल्या सर्वच कुटुंबियांचा समावेश आहे किंवा नाही ते एकदा तपासून पहा. आपल्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती दाखल होताच, मेडिक्लेम पॉलिसी मध्ये सुधारणा करण्यास हवी. आपल्या आर्थिक सल्लागारास, कुटुंबातील असे बदल आवर्जून सांगणे आवश्यक असते. आता ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील, मेडिक्लेम पॉलिसी सुविधा उपलब्ध आहे. अगदी सत्तर वर्षाच्या व्यक्तीलासुद्धा मेडिक्लेम पॉलिसी मिळते. तेव्हा आपल्या आई-वडीलांच्या नावाचाही , मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समावेश करून घ्या. मेडिक्लेम पॉलिसी जुनी असली तरी बऱ्याच वेळा विमा कंपनीकडूनही चुका होऊ शकतात आणि “नो क्लेम बोनस”, पुढच्या नूतनीकरण झालेल्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जात नाही. पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी ही बाब देखील तपासून घेतली पाहिजे. बहुतेक सर्व मेडिक्लेम पॉलिसी कंपनी मार्फत, दर दोन वर्षांनी किंवा चार वर्षांनी “मेडिकल टेस्ट” साठी लागणारा सर्व खर्च दिला जातो. ह्या सुविधेचा लाभ, आपण वेळचेवेळी घ्यायला पाहिजे. मेडिक्लेम पॉलिसीचा लाभ मिळणेसाठी, कुठल्याही आजारपणामुळे जर रुग्णालयात दाखल व्हावे लागले तर कमीत कमी 2४ तास ऍडमिट असणे गरजेचे असते. ॲक्सिडेंट/अपघातच्या केस मध्ये मात्र हे सक्तीचे नाही. अशावेळी, तुम्ही उपचार घेऊन घरी जाऊ शकता, फक्त कागदपत्रांची पूर्तता उपचारादरम्यानच करावी लागते. आपल्या आर्थिक सल्लागाराला, आपण "अर्था " शी निगडीत असलेल्या आणि त्यावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व बाबींची यथायोग्य, वेळेचेवेळी माहिती, पूर्णपणे द्यायाला हवी.
अशी सर्व काळजी, आपण घेतली तर मेडिक्लेम पॉलिसी मार्फत अपेक्षित असणारे लाभ, आपल्याला मनस्तापाशिवाय घेता येतील.Hold hand of right buddy..
Investing in Equity or Mutual Funds
is like playing a Test Match. The more you stay on the crease; chances are more
to make high scores. The Run Rate (Rate of Return) is not that important. If we
continuously focus high Run Rate (returns), there are high chances of getting
out at early stage. We just need to ensure we are playing with a good batsman
irrespective of whether he is Virat, Sachin, Dhoni or Shikhar, Rahul or Rohit.
We know all shall score high if any one of them remain on crease for a longer
time. As we don’t know who is going to score more in the long run, we cannot
assure high returns on any single scheme. Also, to be in the leading position,
we need to do few adjustments in the batting strategy (Portfolio Balancing)
leveraging on the situation offered from the opponents (Market). Here, in this
inning of your investments with you as a batsman, your Financial Advisor plays
the role of Buddy on the pitch, who holds your hands in all situations and
manages your emotions and hence your performance!!
Hence investment in Mutual Funds or
Equity simulates to playing a Test Match
where rate of return is just a check, whereas consistency and staying on the
crease for long time is the key to WIN. Hold hand of right buddy to achieve
Best Performance!!
लेख-मराठी - गट ३: तीचे
अर्थभान (महिलांसाठी फक्त)
तीचे
अर्थभान
घरातील आर्थिक निर्णय असू देत नाहीतर चर्चा, आपल्या आजूबाजूला घडणारे अनेक 'अर्थ'पूर्ण प्रसंग पाहिल्यानंतर हे खचितच मनात येते की 'घरातील स्त्रियांची, कुटुंबासंबंधित घेतल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांबाबत/ नियोजनामध्ये नक्की काय भूमिका असते ? आधुनिक जगातील स्त्री वर्गाला पुरेसे अर्थभान आहे का?' घरातील स्त्री, मग ती स्वतंत्रपणे कमाविती असू देत किंवा नाही, तिचे घरातील आर्थिक निर्णयांबाबतचे मत अगदीच मोजक्याच घरांमध्ये जमेस धरले जाते. याला कारण ठरते स्त्रीचे 'अर्थभान'
!
आपला पेहराव, वागणे-बोलणे, घराचा चेहरा-मोहरा 'अप टू डेट' ठेवणारी स्त्री, तिच्या आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मात्र 'आउट-ऑफ-डेट' दिसून येते. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल-मीडियाला चुटकी(की बोटां)सरशी हाताळणारी स्त्री आर्थिक-निर्णय घेण्याच्या बाबतीत मात्र परावलंबीच आहे असे चित्र दिसते.आपल्या कुटुंबाकरिता कुठले आर्थिक निर्णय घेतले जातात आणि घ्यायला पाहिजे यावर स्त्रीलाही आपले स्वतंत्र, अभ्यासपूर्ण मत मांडता आले पाहिजे. आपल्याला बचत/गुंतणवुक माध्यमांचे पुरेसे ज्ञान नाही या वास्तवाला 'आता वेळ नाही' किंवा 'इतर कामे काय कमी आहेत' अशा सबबी सॊयीस्कररित्या पुढे करुन, स्त्रिया दूर ठेवू पाहतात. आर्थिक बाबींमध्ये सहभागी होण्याच्या संधीला त्या आळसापोटी, अज्ञानापोटी वेळोवेळी दवडतात.
'म्युचुअल फंड्स' , 'टॅक्स रिटर्न्स', 'लोन रिपेमेंट ऑप्शन्स' इ. सारखे शब्द नुसते ऐकले तरी 'ते सगळे आमच्या ह्यांच्याशी बोला' असा आपल्या 'ह्यां'च्याकडे अंगुलीनिर्देश करून स्त्रीवर्ग स्वतःची सुटका करून घेतो. खूपच कमी स्त्रिया अशा सर्व बाबी स्वतंत्रपणे हाताळतांना दिसतात. केव्हाही, कुठल्याही आर्थिक विवंचनेस, अनपेक्षीतरित्या सामोरे जावे लागू शकते ह्याची जाणीव ठेवून प्रत्येक स्त्री ने आर्थिक बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व आर्थिक योजनांचा, गुंतवणूक माध्यमांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती जोपासण्याची आवश्यकता आहे.
मैत्रिणिनो, करा विचार, करा अंमल ! जागवा स्वतःचे अर्थभान ! तुमच्यासाठी ... तुमच्या
लाडक्या कुटुंबियांसाठी !!