जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,
जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,
ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,
जो आमच्या जगण्याचा असे सूर !!
भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन,
त्याचे काय संभव विसर्जन ?
संकल्प घ्यावा त्यास आज प्रार्थून,
मीपणा आणि अहंभावाचे, करितो आज विसर्जन !! 🙏🏼
- रुपाली